खेडमधील अमोल मोरे यांचे आकस्मिक निधन

खेड | प्रतिनिधी : खेड शहरातील युवा सामाजिक तरुण अमोल जनार्दन मोरे यांचे शुक्रवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास आकस्मिक निधन झाले ते ४० वर्षांचे होते. त्यांच्या आकस्मिक निधनाने शोककळा व्यक्त होत आहे
अमोल मोरे हे उत्तम निवेदक म्हणून सर्वाना परिचित होते. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच अनेकांनी महाड नाका येथील त्यांच्या निवासस्थानी धाव घेतली. शनिवारी सकाळी १० वाजता खेड येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या मागे आई, वडील, पत्नी, १ मुलगा ,भाऊ असा परिवार आहे.