‘क्रेडाई’ च्या ‘वास्तुरंग’ प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद

रत्नागिरी : प्रतिनिधी
शहरातील वास्तुरंग या क्रेडाई संस्थेच्या माध्यमातून आयोजित बांधकाम व्यावसायिकांच्या प्रदर्शनाला रत्नागिरीकरांनी पहिल्या व दुसर्‍या दिवशी उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. रत्नागिरीकरांसह चाकरमानी व मुंबई-पुणे येथील  नागरिकांना एकाच जागेवरती वस्तुरंगचे प्रदर्शन उपयोगी पडणार आहे.

शहरातील शासकीय जलतरण तलावाजवळ हे वस्तुरंग प्रदर्शन भरवण्यात आले आहे. रत्नागिरी शहरातील तब्बल 40 बांधकाम व्यावसायिक सहभागी असलेल्या क्रेडाईने नागरिकांना एकाच छताखाली विविध बांधकाम व्यावसायिकांच्या वास्तू व अन्य सुखसोयींची माहिती मिळणार आहे.
याठिकाणी बँकांचे स्टॉल असून, गृहकर्जांसंदर्भात माहिती, अद्यायावत सीबीएससी बोर्ड शाळेची माहितीही याठिकाणी मिळणार आहे. 22 डिसेंबरपासून या प्रदर्शनाला सुरुवात झाली असून 26 डिसेंबरपर्यंत हे प्रदर्शन पाहता येणार आहे. 22 डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, सिंधुरत्न समितीचे सदस्य किरण सामंत, पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, मुख्य कार्यकारी अधिकारी किर्ती किरण पुजारा  यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.
रविवारी रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत या प्रदर्शनाला भेट देणार आहेत. त्याचप्रमाणे माजी मंत्री विनोद तावडे, खासदार विनायक राऊत हेही भेट देणार असल्याचे क्रेडाईचे अध्यक्ष नित्यानंद भुते यांनी सांगितले. वास्तुरंग प्रदर्शनाचा फायदा निश्चित स्वरुपात होत असतो, अनेक नागरिक त्यानंतर विचार करुन, आपल्या आवडीनिवडीचे घर खरेदी करीत असल्याचेही त्यांनी सांगितले. पुण्यासह अन्य नागरिकांचा कल हा समुद्रकिनार्‍याजवळील बांधकामांकडे असतो तर मुंबईतून येणारा चाकरमानी शहर व रेल्वेस्थानक याच्या जवळपास होणार्‍या बांधकामांची निवड करीत असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी बांधकाम व्यावसायिक महेश गुंदेजा, दीपक साळवी, संतोष तावडे यांच्यासह पदाधिकारी, प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक उपस्थित होते.