मसुरे | झुंजार पेडणेकर : श्री समर्थ बागवे महाराज संस्थान मसुरे देऊळवाडा दत्तवाडी दत्तमंदिर येथे दत्तजयंती उत्सवानिमित्त २४ ते २६ डिसेंबर पर्यंत विवीध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. २४ रोजी सकाळी ९ वा. अंडर आर्म क्रिकेट स्पर्धा, रात्रौ ९वा. हभप हृदयनाथ गावडे यांचे नाथांना दत्तदर्शन या विषयावर कीर्तन. २५ रोजी सकाळी ७ ते १२ वा. पर्यंत दत्तगुरुंचे पुजन आणि अभिषेक, दुपारी १२ वा. महाआरती, रात्रौ ८ते १० वा. हरिपाठ ( सांगवे कणकवली), रात्रौ १० ते ११ वा. श्री समर्थ बागवे महाराज मंडळाचे दिंडी नृत्य व सुश्राव्य भजने, ११ वा. दीपोत्सव, रात्रौ ठीक १२ वा. दत्तजन्म व पालखी सोहळा, २६ रोजी दुपारी १२ वा. महाआरती, दुपारी २ ते ५ वा. महाप्रसाद, रात्रौ ठीक १० वा. ओंकार दशावतार नाट्य मंडळ म्हापण वेंगुर्ले यांचा महान पौराणिक धडाकेबाज नाट्यप्रयोग “नागतपस्वी”
गोष्ट एका रात्रीची हा दशावतारी नाट्यप्रयोग सादर होणार आहे. तरी या कार्यक्रमांचा लाभ भाविकांनी घ्यावा असे आवाहन बागवे महाराज संस्थानच्या वतीने करण्यात आले आहे.










