मसुरे | झुंजार पेडणेकर
देवगड तालुक्यातील मुणगे येथील रिक्षा चालक-मालक संघाच्या वतीने ७ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ वाजता श्री भगवती हायस्कूल तिठा येथे श्री सत्यनारायण महापूजेचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी दहा वाजता आरती व तीर्थ प्रसाद, सायंकाळी ७ ते ९ स्थानिक भजने, रात्री दहा वाजता ओंकारा ग्रुप मालवण यांचा सोलो डान्स, ग्रुप डान्स, मिमिक्री, तुफान विनोदी नाटिका अशा विविध बहारदार कलाकृतीने नटलेला ‘कलाविष्कार नव्या युगाचा नव्या दमाचा’ हा व्हरायटी शो होणार आहे. कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन रिक्षा चालक-मालक संघ मुणगे यांच्यावतीने करण्यात आले आहे.