कुडाळ | प्रतिनिधी : श्री संत बाळूमामा यांच्या पादुकाचे दर्शन व भंडारा उत्सव सोहळा सोमवार ६ फेब्रुवारी ते ८ फेब्रुवारी पर्यंत पाट येथील श्री माऊली मंदिर येथे संपन्न होणार आहे आदमापुर निवासी श्री संत बाळूमामांच्या पादुकांचे आगमन पाट व म्हापण गावात होणार आहे या निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये सोमवार ६ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ वाजता श्री संत बाळूमामांच्या पादुकांचे म्हापण बाजारपेठ येथे आगमन, सकाळी ९.३० वाजता पादुकांची म्हापण बाजारपेठ ते पाट माऊली मंदिर पर्यंत पालखी मिरवणूक, दुपारी १०.३० वाजता माऊली मंदिर पाट येथे श्रींच्या पादुकांचे आगमन ५१ सुहासिनींच्या हस्ते पंचारतीने ओवाळून स्वागत, दुपारी ११ वाजता पादुकांचे पूजन ग्रंथ पूजन, विना पूजन, आरती व तीर्थप्रसाद, दुपारी ११.१५ वाजता श्री संत बाळूमामा टीव्ही सिरीयलमध्ये छोट्या बाळूमामाची भूमिका साकारणारा बालकलाकार समर्थ पाटील यांची उपस्थिती, दुपारी ११.३० वाजता, पाट येथील श्री संत नामदेव महाराज भजन मंडळ यांचे हरिपाठ व नामस्मरण, दुपारी १.३० वाजता महाप्रसाद व निवती येथील हरिओम सांप्रदायिक महिला भजन मंडळाचे भजन, दुपारी २.३० वाजता निवती येथील महापुरुष वारकरी भजन मंडळ यांचे भजन, दुपारी ४ वाजता तारकर्ली येथील ह. भ. प. दाजीबुवा मालणकर यांचे कीर्तन, सायं. ६ वाजता कर्ली येथील बाळूमामा सत्संग भजन मंडळ यांचे भजन, सायं. ७ वाजता पावशी धनगर समाज मंडळ यांचे धनगरी नृत्य, रात्री ८ वाजता कुडाळ येथील भैरव जोगेश्वरी फुगडी मंडळाची फुगडी रात्री ९ वाजता स्थानिकांची भजने, मंगळवार ७ फेब्रुवारी रोजी पहाटे ४ वाजता काकड आरती, सकाळी ६ वाजता श्री संत बाळूमामा चरित्र ग्रंथ पारायण, सकाळी १०.३० वाजता पाट येथील नामदेव महाराज भजन मंडळाचे भजन, दुपारी १.३० वाजता महाप्रसाद, दुपारी २ वाजता निवती येथील गणेश महिला वारकरी भजन मंडळाचे भजन, दुपारी ३ वाजता आदमापूर येथील ह. भ. प. नाना महाराज पाटील यांचे कीर्तन सायं. ५ वाजता केळुस तारादेवी फुगडी मंडळाचे फुगडी, सायंकाळी ६ वाजता म्हापण धनगरवाडी यांचे चपई नृत्य सायं. ७ वाजता सरंबळ येथील सत्संग महिला भजन मंडळाचे भजन, रात्री ८ वाजता अणाव येथील श्री ब्राह्मण देव प्रसादिक भजन मंडळाचे भजन, रात्री ९ वाजता स्थानिकांची भजने, बुधवार ८ फेब्रुवारी रोजी पहाटे ४ वाजता काकड आरती, सकाळी ६ वाजता संत बाळूमामा ग्रंथ पारायण, सकाळी १० वाजता वेतोरे येथील ह. भ. प. भाऊ नाईक यांचे कीर्तन, दुपारी १२.३० वाजता दहीहंडी, दुपारी १.३० वाजता महाप्रसाद होणार आहे तरी भक्तांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन पाट म्हापण पंचक्रोशी ग्रामस्थ व श्री संत बाळूमामा भक्त परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.