जॉन पिंटो स्मृती पुरस्कार जेरोन फर्नांडिस व रुजाय फर्नांडिस यांना प्रदान

आचरा : सिंधुदुर्ग जिल्हा खिश्चन विकास मंडळ, मुंबई पुरस्कृत मानाचा जॉन पिंटो स्मृती पुरस्कार आज आचरा जामडुल येथे आचरा येथील जेरोन फर्नांडिस व चिंदर येथील रुजाय फर्नांडिस यांना प्रदान करण्यात आला. सामाजिक क्षेत्रात भरीव काम करणाऱ्या व्यक्तींना हा पुरस्कार दिला जातो. पुरस्कारप्राप्त फर्नांडिस यांना शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र आणि रोख रक्कम देऊन त्यांना मान्यवारांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

या पुरस्कार वितरण सोहळ्याची सुरुवात घुमट वादनाने मान्यवरांचे स्वागत करत दिपप्रज्वलन करून करण्यात आली यावेळी ज्येष्ठ धर्मगुरु फादर मायकल जी. फादर फ्रान्सिस डिसोजा, साहित्यिक मालवणी कवी रोझारिओ पिंटो, फासकर लोबो, अध्यक्ष पासकोल लोबो, सरचिटणीस विल्यम फर्नांडिस, मालवण खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष राजन गांवकर , जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष अशोक कांबळी, बाबाजी भिसळे, जयप्रकाश परुळेकर, सुरेश गांवकर, जे.एम.फर्नांडिस, नरेश तारकर आदि मान्यवर तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.

पुरस्काराला उत्तर देताना जेरोन फर्नांडिस म्हणाले कीं जॉन पिंटो यांनी आपल्या साहित्याने लेखणीच्या माध्यमातून फार मोठे समाजकार्य केलेले आहे आणि त्यांच्या नावाने मला हा पुरस्कार मिळतोय हा पुरस्कार ज्या जन्मभूमीत जन्मलो, मोठा झालो त्या आचरा भूमीत मिळतोय ही माझ्यासाठी भाग्याची गोष्ट आहे. कोणतीही जातपात न बघता माझे समाजसेवेचे काम मी अविरत चालू ठेवणार असल्याचे ते म्हणाले. दुसरे पुरस्कारप्राप्त रुजाय फर्नांडिस म्हणाले कीं नोकरी, घरचा प्रपंच सांभाळून गेली वीस वर्षे समाजसेवेचे व्रत अंगीकारले समाजसेवा केली त्याची पोचपावती म्हणूनच हा पुरस्कार मिळाला पुरस्कार मिळाल्याचा मला सार्थ अभिमान असल्याचे ते म्हणाले. या कार्यक्रम प्रसंगी मालवणी कविता सातासमुद्रापार पोहचवीणारे मालवणी कवी रोझारिओ पिंटो यांनी कविता सादर करत कार्यक्रमात रंगत आणली होती.