‘ज्ञानदीप’मध्ये बँकेच्या कॅम्पस मुलाखती

खेड (प्रतिनिधी) ज्ञानदीप शिक्षण प्रसारक मंडळ संचालित ज्ञानदीप महाविद्यालयात आय.क्यु.ए.सी. विभागाच्या वतीने आय.सी. आय.सी.आय. बँकेच्या कॅम्पस मुलाखती पार पडल्या.

शिक्षण पूर्ण झाल्यांनतर विद्यार्थ्यांना नोकरीची संधी उपलब्ध व्हावी याकरिता मुलाखतीचे आयोजन करण्यात आले होते. त्यानुसारआय.सी.आय.सी.आय. बँकेतर्फे रिलेशनशिप व्यवस्थापक पदासाठी मुलाखती घेण्यात आल्या. तृतीय वर्षांमध्ये शिकत असलेल्या ५० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. बँकेचे व्यवस्थापक सर्वेश दामले यांनी विद्यार्थ्यांना भरण्यात येणाऱ्या पदांविषयी माहिती देत कामाचे स्वरूप सांगितले. याप्रसंगी प्रा. डॉ. उमेशकुमार बागल उपस्थित होते. संस्थाध्यक्ष अरविंद तोडकरी यांच्यासह संस्था पदाधिकाऱ्यांनी उपक्रमाचे कौतुक केले.