गोविंदरावजी निकम कृषि महाविद्यालय मांडकी-पालवण येथे ‘राष्ट्रीय किसान दिवस’ साजरा

चिपळूण (प्रतिनिधी) : तालुक्यातील कृषिभुषण डॉ. तानाजीराव चोरगे शिचण व संशोधन संस्था, मांडकी-पालवण येथे भारताचे पाचवे पंतप्रधान चौधरी चरणसिंग यांचा जन्मदिवस २३ डिसेंबर हा ‘राष्ट्रीय किसान दिवस’ साजरा करण्यात येतो आधुनिक पद्धतीने शेती करून आपण शेतीतून अधिक उत्पादन मिळवू शकतो आणि भविष्यात जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी शेती व्यवसायाकडे वळावे या हेतुने या कार्यकमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाला राष्ट्रीय पुरस्कार विजेते शेतकरी सचिन कारेकर उपस्थित होते.

या कार्यकमाचे प्रमुख अतिथी व प्रगतशील बागायतदार सचिन कारेकर यांनी शेती व्यवयायिक तत्वावर कशाप्रकारे करावी व त्यांनी शोधुन काढलेले SK4 हे हळदीचे वाण त्यांनी कशाप्रकारे विकसित केले याबद्दल माहिती दिली. या कार्यक्रमाचे अध्यक्ष कृषिभुषण डॉ. तानाजीराव चोरगे यांनी पारंपारिक शेतीपद्धती व आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आपण चांगल्याप्रकारे शेती करू शकतो याचे महत्व विद्यार्थ्यांना पटवून दिले. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना भविष्याच्या दृष्टीकोनातून मार्गदर्शन केले. तसेच माणसाने आपल्या गरजा कमी करणे गरजेचे आहे. तरच शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर उंचावेल असा त्यांनी नवीन पिढीला संदेश दिला. कु. शितल डोहाळे या विद्यार्थीनीने प्रास्ताविकेद्वारे कार्यकमाचा मुख्य हेतू सागितला.

या कार्यक्रमांतर्गत निबंध स्पर्धा आयोजित केल्या होत्या. या स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना पारितोषिक व प्रमाणपत्र देण्यात आली. कु. मृणाल ठाकरे व कु. आर्या दुर्गुळे या विद्यार्थीनीने आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाला संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. निखिल चोरगे, संचालिका व वरिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या सौ. अंजली चोरगे, गोविंदरावजी निकम कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य, डॉ. संकेत कदम तसेच जिजामाता महिला कृषि महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. सौ. शमिका चोरगे, महाविद्यालयाचे प्राध्यापक, विद्यार्थी, विद्यार्थीनी उपस्थित होत्या.