नवांकुर बालकुमार संमेलनात न्यू इंग्लिश स्कूल उभादांडा हायस्कूलचे यश 

वेगुर्ला l प्रतिनिधी :नवांकुर बालकुमार साहित्य संमेलन तुळस येथे शिवाजी हायस्कूल मध्ये मोठ्या उत्साहात संपन्न झाले.

या संमेलनात विद्यार्थ्यांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी विविध स्पर्धा ही घेण्यात आल्या या स्पर्धेत कथानक, वक्तृत्व, आणि निंबध लेखन या तिन्ही स्पर्धेत न्यू इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी यश मिळवत आपली यशाची पंरपरा अबाधित राखली.

वक्तृत्व स्पर्धेत इयत्ता आठवी ची अमृता दत्ताराम नवार हिने उत्तेजनार्थ क्रमांक प्राप्त केला तर इयत्ता नववीच्या स्नेहा प्रकाश हिने कथानक स्पर्धेत यश मिळवलं तर दहावीची कु.श्रुती श्रीधर शेवडे हिने मला आवडलेले पुस्तक यावर निंबध लेखन करत प्रथम क्रमांकाची मान मिळवला

नवांकुर बालकुमार साहित्य संमेलनात विविध स्पर्धत सहभागी झालेल्या स्पर्धेतील सर्व विजेत्याना लोककला अभ्यासक ,युवा व्याख्याते, सुप्रसिद्ध निवेदक आणि हिंदी विषयाचे शिक्षक प्रा. वैभव खानोलकर आणि

या प्रशालेचे लिपिक अजित केरकर व इतर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी हि मार्गदर्शन व सहकार्य केले.

न्यू इंग्लिश स्कूल उभादांडा हायस्कूलच्या या सर्व विजेत्यांना रोख रूपये आणि सन्मानचिन्ह देऊन पारितोषिक वितरण समारंभात मान्यवराच्या हस्ते गौरविण्यात आले

या उल्लेखनीय यशाबद्दल न्यू इंग्लिश स्कूल उभादांडा वेंगुर्ले हायस्कूलचे मुख्याध्यापक उमेश वाळवेकर, संस्था अध्यक्ष विरेंद्र आडारकर कामत, सचिव जेष्ठ रांगोळीकार रमेश नरसुले, उपाध्यक्ष निवृत्त गट शिक्षणाधिकारी रमेश पिगुळकर, निलेश मांजरेकर आणि सर्व पदाधिकारी यांनी या स्पर्धेचे विजेते ठरलेले अमृता नवार, स्नेहा वेंगुर्लेकर आणि श्रुती शेवडे या विद्यार्थीनींचे तसेच मार्गदर्शक शिक्षक खानोलकर , लिपिक अजित केरकर व सर्व शिक्षक आणि पालकाचे यांचे हि विशेष अभिनंदन केले.

न्यू इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी बालसाहित्य संमेलनात केलेल्या दमदार कामगिरीचे विविध स्तरांवर कौतुक केले जात असुन त्याचा वर अभिनंदनचा वर्षाव होत आहे.