प्राथमिक फेरीत रत्नागिरी तालुक्यातील विविध शालेय विद्यार्थ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद
रत्नागिरी : समर्थ भारत अभियान (पिंपरी चिंचवड)चे डॉ. राजीव नगरकर आणि समर्थ सेवा मंडळ, सातारा तर्फे रत्नागिरी आणि पाली पंचक्रोशीतील शाळेत मनाचे श्लोक पाठांतर स्पर्धेची प्राथमिक फेरी खूप उत्साहात संपन्न झाली. विविध गटात आयोजित केलेल्या स्पर्धेत एकूण ३०० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. त्या पैकी ८१ विद्यार्थीची निवड अंतिम फेरी साठी झाली आहे.
अंतिम फेरी दिनांक ६ जानेवारी २४ रोजी सकाळी १० ते १ या वेळेत कृ. चि. आगाशे आणि बियाणी बालमंदिर ह्यांच्या नाटेकर सभागृहात होणार आहे. प्रत्येक गटातून तीन क्रमांक आणि उत्तेजनार्थ नंबर काढून त्यांना ट्रॉफी व मेडल्स देऊन त्यांचा सत्कार गौरव करण्यात येईल.
त्याच दिवशी दिनांक ६ जानेवारी २४ रोजी सायंकाळी ५ ते ६.३० या वेळेत बक्षीस वितरण सोहळा पटवर्धन शाळेच्या ठाकूर सभागृहात आयोजित केला आहे.
या सर्व उपक्रमात समीक्षक म्हणून सौ. समिधा बाष्टे, सौ. अनुराधा ताटके, सौ. पर्णिका मुळ्ये, सौ, स्नेहल भट, भक्ती भट, शिला जोशी, सौ. पूर्वा खालगावकर, सौ.सीमा कदम, सौ. दिपाली आठवले, सौ. अस्मिता सरदेसाई, सौ. प्राची गोडबोले, सौ. प्रज्ञा लिमये, सौ. केळकर, सौ. अलका बेंदरकर, डॉ निशिगंधा पोंक्षे यांनी काम केले.











