मुस्लिम बांधवांनी घेतली आमदार नितेश राणे यांची भेट
कोळपे गावच्या विकासकामाबाबत केली चर्चा
वैभववाडी | प्रतिनिधी : कोळपे जमातवाडी येथील मुस्लिम बांधवांनी आमदार नितेश राणे यांचे भेट घेत गावातील विकास कामाबाबत चर्चा केली. यावेळी आमदार नितेश राणे यांनी जमातवाडी दर्ग्याला सभामंडप उभारण्यासाठी निधी देणार असल्याचे जाहीर केले आहे. भाजपा युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष हुसेन लांजेकर उपस्थितीत मुस्लिम बांधवांनी गावातील विकास कामाबाबत आ. राणे यांच्याशी सविस्तर चर्चा केली.
यावेळी कोळपे माजी उपसरपंच बाबालाल लांजेकर, माजी उपसरपंच हमीद लांजेकर, फकीर नंदकर, हमीद नाचरे, शहाबुद्दीन चोचे, शहाबुद्दीन लांजेकर, ग्रामपंचायत सदस्य तोफिक लांजेकर, शब्बीर नंदकर, ताया चोचे, रज्जाक नाचरे, कय्युम नंदकर, नासिर नंदकर, हुसेन उमर लांजेकर, कादिर थोडगे, अकबर लांजेकर, सल्लाउद्दीन लांजेकर, दाऊद लांजेकर व पदाधिकारी उपस्थित होते.तसेच या बैठकीला नांदगाव भाजपा पदाधिकारी राज्जाक बटवाले, उपसरपंच इरफान नावळेकर, भाजपा पदाधिकारी मनोज रावराणे आदी उपस्थित होते.











