कणकवली : हळवळ फाटा येथे मालवणहुन मुंबईच्या दिशेने जाणारी ट्रॅक्स क्रमांक एम एच ११ बी एच ०११५ गाडीला अपघात झाला. यामध्ये साधारण दहा जण प्रवास करत होते. या अपघातातील अपघातग्रस्तांना १०८ क्रमांक च्या रुग्णवाहिकेने कणकवली उपजिल्हा रुग्णालय येथे हलविण्यात आले आहे.
यावेळी स्थानिक ग्रामस्थांनी धाव घेत अपघातातील जखमींना बाहेर काढून उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात हलविले असल्याची माहिती दिली. मालवणहुन मुंबईच्या दिशेने जाताना हळवल फाटा येथील अवघड वळणावर चालकाने अचानक ब्रेक लावला त्यामुळे गाडी पलटी झाली अशी माहिती घटनास्थळावरील ग्रामस्थांनी दिली.












