रायगड Breaking : ताम्हाणी घाटात पुणे येथील खासगी बसला अपघात; दोघांचा मृत्यू

रायगड : रायगड जिल्ह्यात माणगाव हद्दीत ताम्हाणी घाटात कोंडेथर वळणाजवळ पुणे येथील खासगी बसला भीषण अपघात झाला आहे.यात दोघांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

या अपघातात 55 जण जखमी झाले असून दोघांचा मृत्यू झाला आहे. दोन्ही महिला असल्याची प्राथमिक माहिती आहे.

माणगाव तालुक्यात ताम्हाणी घाटात हा शनिवारी सकाळी अपघात झाला आहे. ही बस कोकणात येत असताना हा अपघात घडला. पुण्यातील खासगी कपंनीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची ही बस होती.

माणगांव पोलीस ठाणे हद्दीत सकाळी आठ वाजण्याच्या सुमारस ट्रॅव्हल्स क्रमांक MH 04 FK 6299 हि बस पुणे वरून माणगांव कडे येत असताना रस्त्याखली उतरल्याने पलटी होऊन अपघात झाला आहे. घटनास्थळी माणगाव पोलिसांनी धाव घेतली आहे. माणगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील हे घटनास्थळी दाखल झाले आहेत.

जखमीना उपजिल्हा रुग्णालय माणगांव,येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहें.