खेड(प्रतिनिधी) खेड येथील ज्ञानदीप शिक्षण प्रसारक मंडळ खेड (रत्नागिरी) तर्फे इ. १० वी च्या विद्यार्थ्यासाठी व पालकांसाठी रविवार दि ३१ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १०.३० वाजता खेड – चिपळूण – गुहागर – देवरुख – संगमेश्वर या ठिकाणी सेमिनार आयोजित करण्यात आला आहे.
तसेच विद्यार्थ्यांसाठी ज्ञानदीप इंटरस टेस्ट दि. ३१ डिसेंबर २०२३ रोजी खेड – चिपळूण – देवरुख – संगमेश्वर व गुहागर येथे घेण्यात येणार आहे. सदरचा सेमिनार व टेस्ट खेड येथे ज्ञानदीप विद्या संकुल भडगाव व मोरवंडे-बोरज या ठिकाणी तसेच चिपळूण येथे ब्राह्मण सहाय्यक संघ, बेडेकर सभागृह, वीरेश्वर मंदिर परिसर येथे व गुहागर येथील कै. इंदिरा वासुदेव शेट सभागृह, नगरपंचायत मागे, भंडारी भवन येथे तसेच देवरुख येथे पित्रे सांस्कृतिक कलामंच , शिवाजी चौक व संगमेश्वर येथील बोंद्रे क्लासेस या ठिकाणी संपन्न होत आहे . तरी इ. १० वी मध्ये शिकणाऱ्या सर्व विद्यार्थी व पालक यांनी अवश्य उपस्थित राहावे असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष अरविंद तोडकरी यांनी केले आहे.









