कणकवली : आष्टी वरून आलेली विद्यार्थ्यांची शैक्षणिक सहलीची एसटी कणकवली बस स्थानकामध्ये आत जात असताना सर्विस रस्त्यावरून जाणाऱ्या एका दुचाकी स्वाराला एसटीची धडक बसली. यात दुचाकीस्वार किरकोळ जखमी झाला. तर दुचाकी चे मोठे नुकसान झाले. हा अपघात कणकवली बस स्थानकासमोर मंगळवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास घडला.
अपघातानंतर आगार प्रमुख संदीप पाटील हे काही वेळाने घटनास्थळी दाखल झाले. तोपर्यंत सर्विस रस्त्यावरील एका बाजूची वाहतूक ठप्प झाली होती. या सर्विस रस्त्याच्या एका बाजूला स्पीड ब्रेकर घालण्याची मागणी स्थानिकांमधून वारंवार केली जात असताना एसटी विभाग या मागणीबाबत पाठपुरावा करत गांभीर्याने घेत नसल्याने असल्याने असे वारंवार अपघात घडत आहेत.
कणकवली बस स्थानकाच्या बाहेर एसटी या ठिकाणी बस स्थानकामध्ये जातात व बस स्थानका मधून बाहेर येतात या दोन्ही ठिकाणी सर्विस रस्त्यावर स्पीडब्रेकर घालण्याची गरज आहे. कारण सर्विस रस्त्यावरून येणारी अनेक वाहने एसटीला धडक देण्याचे किंवा एसटीची त्या वाहनांना धडक बसण्याचे प्रकार सातत्याने घडत असतात. मंगळवारीही तसाच प्रकार घडून देखील जवळपास दहा ते पंधरा मिनिटं सर्विस रस्त्यावरील वाहतूक ठप्प होऊन देखील झालं बस स्थानका बाहेर अपघात घडल्यानंतरही आगार प्रमुख किंवा एसटीचे जबाबदार अधिकारी घटनास्थळी दाखल झाले नाहीत. त्यानंतर प्रकरण मिटवा मिटवीसाठी आगार प्रमुखांनी सर्विस रस्त्यावर थांबलेली एसटी बाजूला करण्याच्या सूचना दिल्या. दरम्यान ज्या दुचाकी स्वराला धडक बसली ते दुचाकी स्वार देखील एसटी कर्मचारी असल्याचे समजते. सर्विस रस्त्यावर अपघातानंतर थांबलेली एसटी बाजूला करेपर्यंत वाहन चालकांना नाहक मनस्ताप झाला. वारंवार होणाऱ्या या प्रकारांमुळे सर्विस रस्त्यावर स्पीड ब्रेकर घालण्यासंदर्भात एसटी प्रशासनाकडून महामार्ग प्राधिकरण ला पत्रव्यवहार करण्याची मागणी केली जात आहे.







