मुडेश्वर मैदानानजीक असलेल्या सुगंधी वनस्पती प्रक्रिया केंद्रातील दोन मोटर चोरीला

कणकवली : मुडेश्वर मैदानानजीक असलेल्या सुगंधी वनस्पती प्रक्रिया केंद्रातील अर्ध्या एचपीचे १० हजार रुपये किमतीचे एकूण दोन मोटर अज्ञात चोरट्याने चोरून नेले. याप्रकरणी हेमंत अंकुश सावंत (रा. कणकवली) यांच्या फिर्यादीवरील कणकवली पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा चोरीचा प्रकार ३० डिसेंबर रोजी उघडकीस आला. अधिक तपास कणकवली पोलिस करत आहेत.