देवगड : देवगड तालुक्यातील मोंड गावातील प्र. जि. मा. १० ते मोड गावठण, भैराई मंदिर मार्ग ग्रा. मा. ७८ खडीकरण डांबरीकरण करणे. प्र. जि. मा. १० ते मोंड गावठण, भैराई मंदिर मार्ग ग्रा. मा. ७८ किमी ०-०० ते १/४०० मध्ये मजबुतीकरण व डांबरीकरण करणे.
या दोन्ही कामांचे भूमिपूजन आमदार नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. जिल्हा वार्षिक योजनेमधून या दोन्ही कामांना 28 लाख रुपये निधी मंजूर झाला आहे. आमदार नितेश राणे यांनी या कामांसाठी निधी मंजूर करून आणला
अरीफ बगदादी यांनी श्रीफळ वाढवून या कामाचा शुभारंभ केला यावेळी या कार्यक्रमासाठी जिल्हा सरचिटणीस संदीप साटम, बाळ खडपे, प्रकाश राणे, संजय बोंबडी, युवा सेलचे तालुकाध्यक्ष उत्तम बिरजे, महेंद्र माणगावकर , व अन्य भाजपा पदाधिकारी अधिकारी स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते.












