अखेर महिपतगडाच्या खेड दरवाजाने घेतला मोकळा श्वास!

खेड | प्रतिनिधी : खेड तालुक्यातील किल्ले महिपतगड वरील काळाच्या ओघात नष्ट होत चाललेला किल्ल्यावरील खेड दरवाजा  दुर्गवीर प्रतिष्ठान च्या  मावळ्यांनी झाडा झुडुपातून तसेच मातीत गाडला गेलेला दरवाजा मोकळा केल्याने या दरवाजाने गेल्या अनेक वर्षा नंतर मोकळा ‘श्वास’ घेतला आहे
या आधीच्या  मोहिमेत महिपत गडाच्या खेड दरवाजाचा उंबरठा दुर्गवीरांना आढळून आला होता. त्याच वेळी दुर्गवीरांनी संकल्प केला आणि महिना भरात   दोन दिवसांत स्थानिक दुर्गवीर तसेच मुंबई, माणगाव आणि देवरुख येथील एकूण ३७ दुर्गवीरांनी एकत्र येऊन गडाचा खेड दरवाजा मुक्त केला.
पूर्णतःदगडाच्या माती खाली हा दरवाजा गाडला  गेला होता.  त्यावरील दगड आणि माती बाजूला करण्यात आली. हळूहळू  एक एक पायरी मोकळी होऊ लागली आणि बघता बघता गडाचा मुख्य दरवाजा म्हणजेच खेड दरवाजा मुक्त झाल्याने  प्रत्येक दुर्गवीराच्या चेहऱ्यावरून आनंद ओसंडून वाहत होता.
 दोन दिवसात प्रत्येक दुर्गवीराने  खूप मोठी कामगिरी केली आहे. स्थानिक दुर्गवीरांनी कित्येक दिवसांपासून पाहिलेलं स्वप्न  पूर्ण झालं.आहे
या मोहिमेमध्ये दुर्गवीर चे मुंबई मधून अर्जुन दळवी,जयवंत कोळी,विशाल इंगळे,विवेक कोळी,प्रतीक पाटेकर रायगड मधून विठ्ठल केंबळे, प्रमोद डोंगरे,सिद्धांत शिंदे,सुयोग पाटील, प्रसाद आयरे. देवरुख मधून योगेश सावंत, निशांत जाखी, हर्षद सनगले, उत्कर्ष माने, प्रणव राक्षे, अक्षय गवंडी,ओंकार सावंत,दीप्ती दळवी,प्रतीक्षा बाईत, सेजल वास्कर,राहुल रहाटे तर खेड मधील स्थानिक दुर्गवीर रोहित बालडे,राकेश इंदुलकर, स्वप्नील पाडावे,मिथुन दिवेकर, जय पाटील, शैलेश आखाडे, प्रसाद घाणेकर, रोहित म्हादलेकर, सौरभ म्हादलेकर, प्रणव शेठ, वेदश्री इंदुलकर, संस्कृती पाडावे तसेच छोटे दुर्गवीर श्रीरंग इंदुलकर,अर्णव पाडावे, वृंदा इंदुलकर, त्रिशा पाडावे यांनी सहभाग घेतला होता. अजूनही दरवाजाचा आतील आणि बाहेरील भाग आणि असंख्य वास्तू संवर्धनाच्या प्रतीक्षेत आहेत.  या पुढील मोहिमांमध्ये सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे