खेड हिंदुराज मित्रमंडळाची पायीवारीला प्रतिसाद

खेड (प्रतिनिधी)
खेड हिंदुराज मित्र मंडळाच्या वतीने ४  जानेवारी रोजी भरणे येथील श्री देवी काळकाई मंदिर ते कशेडीतील श्री स्वामी समर्थ मंदिरापर्यंत पायीवारीचे आयोजन करण्यात आले होते या पायवारीला भक्त गणांचा प्रतिसाद लाभला.
भरणे काळकाई मंदिरापासून पहाटे पाच वाजता पायीवारीला प्रारंभ झाला . सकाळी ६ वाजता मठात स्वामीना अभिषेक करण्यात आला  स्वामींची आरती व सुसेरी नं २ यांचे  भजन झाले. भरणे येथून निघालेल्या पायीवारीचे स्वामी समर्थ मठात आगमन झाले . महाआरती झाल्यानंतर पायीवारीची सांगता झाली