कुडाळ : तालुक्यातील न्यू शिवाजी हायस्कूल व ज्युनियर कॉलेज ऑफ कॉमर्स,सायन्स, एम सी व्ही सी, व इंग्रजी माध्यम विभाग जांभवडे या प्रशालेचा वार्षिक स्नेहसंमेलन व कृतज्ञता सत्कार सोहळा माध्यमिक शिक्षण समिती जांभवडे पंचक्रोशी या शिक्षण संस्थेचे चेअरमन श्रीमान सुभाष मडव यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला.या प्रसंगी व्यासपीठावर मा.लॉरेन्स मान्येकर माजी जि प सदस्य,शिक्षणसंस्थेचे माजी चेअरमन डॉ. श्री. रामचंद्र (दादा) सामंत, व्हा. चेअरमन बा.शि.परबगुरुजी,सेक्रेटरी एकनाथ चव्हाणगुरुजी, सहसेक्रेटरी रामदास मडव,मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष श्री वामन तर्फे,डॉ प्रशांत मडव, लवू घाडी, मनोहर गावकर, प्राचार्य अनिल कासलेसर, माजी प्राचार्य एस एस सावंत सर व विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन श्री.यु. एम सावंत सर यांनी केले. शिक्षणसंस्थेच्या वयोवृद्ध प्रेरणादायी ज्येष्ठ व्यक्तींचा कृतज्ञता सत्कार सोहळा. या निमित्ताने मा. चेअरमन श्री. सुभाष मडव म्हणाले, 1960 प्रशालेच्या स्थापनेपासून आजपर्यंतच्या दुर्गम खडतर पण प्रगतीच्या 63 वर्षाच्या प्रवासात ज्यांच्या मुळे ज्ञान दानाचे कार्य जांभवडे पंचक्रोशीवासियांच्या घराघरात पोहोचले.हा ज्ञानदीप अधिक तेजोमय झाला. अशा वयोवृद्ध संस्था सदस्यांचा सत्कार हा संस्थेच्या इतिहासातील अनमोल क्षण आहे.या सर्व शिक्षणप्रेमींचं स्मरण व्हावं,त्यांच्या या सेवाभावी कार्याचा परिचय आजच्या विद्यार्थ्याना व्हावा,त्यांची स्वप्ने या नव्या पिढीने पुढे न्यावित या हेतूने,,हा कृतज्ञतासत्कार सोहळा आयोजित केला.अशी कृतज्ञता मा. चेअरमन सुभाष मडव यांनी व्यक्त केली. शिक्षक श्री. पुजारी सर,,श्री एम पी कदम सर प्रा. काटकर सर व इंग्रजी माध्यम शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांच्या बहारदार सांस्कृतिक कार्यक्रमांनी स्नेहसंमेलनाची सांगता झाली.











