ऱाजापूर | प्रतिनिधी :
मराठी पत्रकार दिनाच्या पुर्व संधेला राजापूर तालुका पत्रकार संघाच्या पदाधिकाऱ्यान्नी मराठी वृत्तपत्र सृष्टीचे आद्यसंस्थापक बाळशास्त्री जांभेकर यांच्या पोंभुर्ले येथील स्मारकाला भेट देवुन त्यांच्या पुतळ्याला अभिवादन केले .
कै बाळशास्त्री जांभेकर यान्नी दिनांक ६ जानेवारी १८३२ साली मराठी वृत्तपत्राची सुरवात करताना दर्पण हे वृत्तपत्र सुरु केले होते .त्यानिमित्त दरवर्षी ६ जानेवारी हा मराठी पत्रकारदिन म्हणुन साजरा केला जातो.
मराठी पत्रकारदिनाच्या पुर्वसंधेला राजापूर तालुका पत्रकार संघाच्या पदाधिकाऱ्यान्नी पोंभुर्ले येथील बाळशास्त्री जांभेकरांच्या स्मारकाला भेट दिली व त्यांच्या पुतळ्याला अभिवादन केले . राजापूर तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र मोहीते चिटणीस राजेंद्र बाईत माजी अध्यक्ष विनोद पवार, खजिनदार शरद पळसुलेदेसाई ,सहसचीव प्रकाश नाचणेकर सल्लागार महेश शिवलकर ,संतोष मोंडे ,संतोष शिंदे ,गोकुळ कांबळे ,प्रकाश वळंजू ,राजेंद्र जोगळे आदींसह पोंभुर्लेच्या सरपंच सौ प्रियंका धावडे जांभेकर यांचे वंशज सुधाकर जांभेकर ,बाजीराव जांभेकर उपस्थीत होते .राजापूर पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र मोहीते आणि सल्लागार महेश शिवलकर यांच्या हस्ते बाळशास्त्री जांभेकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला तर पोंभुलेच्या सरपंच सौ प्रियंका धावडे व जांभेकर यांचे वंशज सुधाकर जांभेकर यांचाही राजापूर तालुका पत्रकार संघाच्या वतीने शाल श्रीफळ देवुन सत्कार करण्यात आला.











