लांजा | प्रतिनिधी : तालुक्यातील देवधे येथील जिल्हा परिषद शाळा क्रमांक ४ या शाळेला कोकण पदवीधर मतदार संघाचे आमदार निरंजन डावखरे यांच्या निधीतून संगणक प्राप्त झाला आहे.
त्याबद्दल शाळेच्या वतीने आभार पत्र शाळेचे मुख्याध्यापक श्री.आयरे यांनी भाजपा तालुकाध्यक्ष चंद्रकांत मांडवकर यांच्या कडे दिले. तसेच या संगणका बरोबर प्रिंटर पण आवश्यक असल्याने तसे मागणी पत्र शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष विराज हरमले यांनी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष महेश(मुन्ना) खामकर यांच्या कडे दिले. यावेळी युवा मोर्चा अध्यक्ष अजय गुरव, ओबीसी महिला अध्यक्षा शारदा गुरव, मुख्याध्यापक आयरे गुरुजी, श्री गुंड्ये , व्यवस्थापन समिती सर्व सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.








