बॅ. नाथ पै सेवांगण कट्टा येथे बाल स्पर्धा महोत्सवाचा शुभारंभ!

मसुरे | झुंजार पेडणेकर : बॅ नाथ पै सेवांगण कट्टा येथेबाल स्पर्धा महोत्सवाचा शुभारंभ सायली चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आला. कथाकथन, प्रश्नमंजुषा, चित्रकला, पाढेलेखन, सुलेखन, वेशभूषा आदी १७ प्रकारच्या स्पर्धा होणार असून
त्यासाठी ८०० पेक्षा जास्त स्पर्धकानी सहभाग नोंदवला आहे. शुभारंभ प्रसंगी सायली चव्हाण,दीपक भोगटे, सुजाता पावसकर,बापू तळावडेकर, शिरवलकर व परिसरातील शिक्षक पालक व विद्यार्थी उपस्थित होते.