खेडमध्ये स्टेरिंग छोडो आंदोलन

खेडमध्ये स्टेरिंग छोडो आंदोलन
खेड | प्रतिनिधी : ओन्ली ड्रायव्हर भाऊ मदत संघ सामाजिक संस्थेच्या खेडच्या पदाधिकारी व सदस्यांनी ९जानेवारी पासून स्टेरिंग छोडो आंदोलन सुरू केले आहे.
बुधवारी  आंदोलनाच्या पहिल्या दिवशी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी खेड भरणे मार्गावर एकत्र येवून प्रवास करणाऱ्या वाहन चालकांना या काळ्या कायद्याची माहिती दिली. तसेच यावेळी त्यांनी चालकांचा हार आणि श्रीफळ देवून सत्कार करत त्यांना आंदोलनाचे महत्व पटवून दिले.
यावेळी खेड शहरातील चालक मालक तसेच विविध चालक संघटना सहभागी झाल्या होत्या. या काळ्या कायद्याला विरोध करण्यासाठी खेड शहरातील विविध संघटना एकत्र आल्याचे चित्र यानिमित्ताने पहावयास मिळाले. या आंदोलनावेळी त्यांनी खेड भरणे मार्गावरून प्रवास करणाऱ्या मालवाहू चालकांना या कायद्याची माहिती पटवून दिली.