निकालानंतर शिवसेनेच्या वतीने वेंगुर्ले येथे जल्लोष : फटाक्याची आकाशबाजी व एकमेकांना लाडू भरवत आनंदोत्सव

वेंगुर्ला | दाजी नाईक : विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज ऐतिहासिक निर्णय जाहीर करताना खरी शिवसेना ही शिंदे गटाची त्याचबरोबर व्हीप च्या आधारावर आमदारांना पात्र ठरविण्याचा निकाल दिल्यानंतर तळकोकणात सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिवसेनेच्या वतीने जल्लोष करण्यात आला फटाक्याचे आकाशबाजी व एकमेकांना लाडू भरवत हा आनंदोत्सव साजरा केला यावेळी बाळासाहेब ठाकरे ,धर्मवीर आनंद दिघे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या नावाने जोरदार घोषणा देण्यात आले वेंगुर्ला शिवसेनेत जोरदार जल्लोष करण्यात आला.

यावेळी शहराध्यक्ष उमेश येरंम, युवक शहर प्रमुख संतोष परब महिला उपशहर प्रमुख मनाली परब वडखोल शाखाप्रमुख प्रभाकर पडते राऊळवाडा महिला शाखाप्रमुख रसिका राऊळ,राजू परब,बाळा परब ,संदेश सडवेलकर,देविदास वालावलकर संजय परब दिगंबर राणे यासह अनेक कार्यकर्त्यांनी फटाक्याची आतषबाजी करीत एकमेकांना लाडू भरवीत जल्लोष साजरा केला.