रत्नागिरी | प्रतिनिधी : शहरातील धनजीनाका येथे किरकोळ कारणातून राजीवडा येथील तरुणाला दोघांनी लोखंडी रॉडने मारहाण केली.ही घटना मंगळवार 9 जानेवारी रोजी दुपारी 2 वा.सुमारास घडली आहे.
हुसेन आणि सलमान अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या दोन संशयितांची नावे आहेत.त्यांच्या विरोधात मोहसिन नुरमहम्मद फणसोपकर (39,रा.राजीवडा नाका,रत्नागिरी) याने तक्रार दिली आहे.त्यानुसार,मोहसिनचा मोबाईल हवाल्याप्रकरणी तो शहर पोलिस ठाण्यात अर्ज देण्यासाठी गेला होता.अर्ज दिल्यानंतर तो घरी परतत असाना दुपारी 2 वा.धनजीनाका येथे हुसेनने मोहिसनला थांबवून तु कुठचा असे विचारले.त्यावर त्याने मी राजिवडा येथे राहणारा आहे असे सांगितले.तेव्हा तुम्ही राजिवडा येथील लोक,पुढे आले रे असे बोलून हुसेनने सलमानला हाक मारुन दांडका आण रे असे सांगितले.तसेच मोहसिनची कॉलर पकडून सलमानने आणलेला लोखंडी रॉड घेउन मोहसिनच्या डाव्या पायाच्या पोटरीव व दोन्ही पायांच्या मांडीवर मागच्या बाजुस मारहाण केली.याप्रकरणी दोन्ही संशयितांविरोधात भादंवि कायदा कलम 324,504,34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.












