रत्नागिरी : मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती श्री.माधवराव राणे यांचे दिनांक ६ जानेवारी २०२४ रोजी मुंबई येथे वृद्धापकाळाने निधन झाले. ते ८६ वर्षांचे होते. त्यांचे मूळ गाव दापोली तालुक्यातील बुरोंडी हे होते.
१९७७ ते २००३ अशा प्रदिर्घ कालावधीत मुंबई सत्र न्यायालयाचे चे न्यायाधीश ते मुख्य न्यायाधीश व त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती ते राज्य ग्राहक संरक्षण आयोगाचे अध्यक्ष म्हणून विविध जबाबदाऱ्या निष्पक्षपणे पार पाडल्या. आपल्या सुमारे २५ वर्षांच्या दीर्घ कारकिर्दीत न्या. राणे यांनी बाबू रेशीम हत्या चौकशी आयोग ते हर्षद मेहता शेअर्स घोटाळा अशी विविध संवेदनशील व जोखमीचे प्रकरणे हाताळली. एक निष्पक्ष, जाणकार आणि संवेदनशील पण रोखठोक न्यायमूर्ती म्हणून त्यांची ख्याती होती. त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी,१ मुलगा-सून, २ मुली-जावई ६ नातवंडे व २ पतवंडे आहेत.










