माजगांव ग्रामपंचायततर्फे ‘प्लास्टिक पिक अप डे ‘ साजरा

Google search engine
Google search engine

स्वच्छ भारत अभियानांतर्गत उपक्रमात विद्यार्थ्यांसह स्थानिकांचा सहभाग

पर्यावरण संतुलन राखण्यासाठी पर्यावरण पूरक पिशव्या वं रोपे वाटप

सावंतवाडी । प्रतिनिधी : माजगाव ग्रामपच्यातीच्या कार्यक्षेत्रातील विविध ठिकाणच्या परिसरातील प्लास्टिक कचरा गोळा करण्यासाठी माजगावं ग्रामपंचायत सरपंच सौ. अर्चना सावंत यांनी गावातील आजी-माजी लोकप्रतिनिधी पदाधिकारी व आपले सर्व सहकारी तसेच ग्रामस्थांसमवेत मळगाव घाटीसह गावातील अन्य भागात जमा झालेला प्लास्टिक कचरा गोळा करून स्वच्छ भारत अभियान अंतर्गत ‘प्लास्टिक पीक अप डे ‘ उपक्रम साजरा केला.
या उपक्रमासाठी माजगांव येथील भाईसाहेब सावंत माध्यमिक विद्यालयाचे विद्यार्थी एकत्र आले होते. माजगावातील सर्व वाडी रस्ते मदिराजवळील परिसर सातजांभळ, मळगाव घाटी, आशा सर्व भागातील प्लास्टिक एकत्र करून त्यांची विल्हेवाट लावण्यात आली.

यावेळी सरपंच सौ अर्चना सावंत, माजी जि. प. अध्यक्षा सौ. रेश्मा सावंत, उपसरपंच संतोष वेजरे, माजी उपसरपंच संजू कानसे, ग्राप. सदस्य अशोक धुरी, पूजा गावडे, प्रज्ञा भोगण, माधवी भोगण, शीतल भोगणे अन्य ग्रा.प. सदस्य, सामाजिक कार्यकर्ते अजय सावंत, वनविभाग कर्मचारी बबन रेडकर, ग्राम विकास अधिकारी संदीप गोसावी, जिप शाळा सर्व शिक्षकां आरोग्य अधिकारी, आशा सेविका, अंगणवाडी, हायस्कुल मधील मुले, गावातील ग्रामस्थ या उपक्रमात मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
यावेळी प्लास्टिकचा वापर टाळणे ही काळाची गरज आहे अशी माहिती देऊन मार्गदर्शन केले. पर्यावरण संतुलन राखण्यासाठी मुलांनी पर्यावरण पूरक पिशव्या वं रोपे वाटप करण्यात आली त्याला लोकांनी साथ दिली याबद्दल आभार मानले.