वेंगुर्ला न. प. व नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान,वेंगुर्ला चा सहभाग
वेंगुर्ले | प्रतिनिधी : वेंगुर्ला नगरपरिषदेतर्फे आज १२ जानेवारी २०२४ रोजी सकाळी दाभोली नाका ते निमुसगा या रस्त्यावर महास्वच्छ्ता मोहीम राबविण्यात आली.
वेंगुर्ला नगरपरिषदेचे मुख्याधिकारी श्री परितोष कंकाळ व सर्व अधिकारी, कर्मचारी वृंद तसेच नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान – वेंगुर्ला बैठकीचे बहुसंख्य श्री सदस्य या मोहिमेत उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. या स्वच्छ्ता मोहिमे मधे ५०० किलो पेक्षा जास्त प्लॅस्टिक, काचेचा बॉटल व इतर कचरा संकलित करण्यात आला.












