लांजा (प्रतिनिधी) निर्भीड पत्रकार अशी ओळख असलेले लांजा येथील जगदीश कदम यांच्या निधनाबद्दल लांजा तालुका मराठी पत्रकार परिषद आणि लांजावासीय यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी १३ जानेवारी रोजी सायंकाळी ४.०० वाजता कुलकर्णी काळे छात्रालय लांजा येथे शोक सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
जगदीश कदम मूळचे चिपळूण तालुक्यातील मोळी गावचे रहिवासी होते. जगदीश कदम हे गेली पंधरा वर्षांहून अधिक काळ लांजा येथे पत्रकार म्हणून कार्यरत होते. पत्रकारिता बरोबर सामाजिक, शैक्षणिक सांस्कृतिक क्षेत्रात देखील त्यांचे सक्रिय असे योगदान होते .मात्र त्यांचे मंगळवारी अल्पशा आजाराने कोल्हापूर येथे निधन झाले आहे. या निधनाबद्दल लांजा तालुका मराठी पत्रकार परिषद आणि लांजावासीय यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी सायंकाळी चार वाजता शोकसभेचे आयोजन करण्यात आले आहे.
तरी लांजा शहर आणि तालुक्यातील सर्व लोकांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन मराठी पत्रकार परिषद शाखा लांजाच्या वतीने करण्यात आले आहे.












