लांजा महाविद्यालयातील शैलेश रमेश डोळस स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सचे २६ जानेवारी रोजी उद्घाटन

लांजा (प्रतिनिधी) लांजा कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील शैलेश रमेश डोळस स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स या वास्तूचे उद्घाटन शुक्रवार दिनांक २६ जानेवारी रोजी सकाळी १०.३० वाजता श्रीम. रोहिणी डोळस यांच्या हस्ते होणार आहे.

लांजा महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी असलेले शैलेश डोळस यांनी दिलेल्या देणगीतून महाविद्यालयांमध्ये शैलेश रमेश डोळस स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स उभारण्यात आले आहे. या वास्तूचा उद्घाटन सोहळा २६ जानेवारी रोजी पार पडणार आहे. यासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून आमदार भास्कर जाधव तसेच आमदार राजन साळवी, न्यू एज्युकेशन सोसायटी लांजाचे कार्याध्यक्ष जयवंत शेट्ये ,मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीराम उर्फ भाऊ वंजारे, लांजा तालुका व्यापारी संघटनेचे अध्यक्ष प्रसन्न शेट्ये, संस्थेचे ज्येष्ठ संचालक महंमद रखांगी,लांजा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरविंद कुलकर्णी तसेच माजी विद्यार्थी आणि देणगीदार शैलेश डोळस हे उपस्थित राहणार आहेत.

या कार्यक्रमाला शिक्षण प्रेमींनी आणि आजी-माजी विद्यार्थी यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन संस्थेचे उपकार्याध्यक्ष सुनील कुरूप, कार्यवाह विजय खवळे आणि उपप्रचार्य के.आर. चव्हाण यांनी केले आहे.