नगराध्यक्षा नेहा माईणकर यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन
वैभववाडी | प्रतिनिधी : वाभवे – वैभववाडी नगरपंचायत व रोटरी क्लब ऑफ वैभववाडी यांच्यावतीने आयोजित वैभववाडी महोत्सवाचे उद्घाटन नगराध्यक्षा नेहा माईणकर यांच्या शुभहस्ते करण्यात आले. तीन दिवस हा महोत्सव मोठ्या थाटामाटात संपन्न होत आहे. या महोत्सवाचा शुभारंभ शुक्रवारी सायंकाळी पार पडला. यावेळी रोटरी क्लब ऑफ वैभववाडी अध्यक्ष संजय रावराणे व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यानिमित्त आयोजित चित्रकला स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
यानिमित्त विविध सांस्कृतिक तसेच पारंपारिक कार्यक्रम पार पडले. महोत्सवाची सुरुवात संभाजी चौक ते महाकाली कंट्रक्शन इनामदार प्लाझा पर्यंत ढोल ताशाच्या गजरात करण्यात आली. यावेळी मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते. उशिरापर्यंत नागरिकांनी या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने गर्दी केली होती.











