चिपळूण (प्रतिनिधी) : चिपळूण तालुक्यातील नायशी येथील ह.भ.प श्री. आं.बा सावंत माध्यमिक विद्यालय नायशी या पंचक्रोशी शाळेला नायशी गावातील ज्येष्ठ समाजसेवक जे. जे.रुग्णालयातील निवृत्त अधिकारी श्री. नीळकंठ अर्जुनराव घाग (घागवाडी) यांच्याकडून विद्यालयातील मुलींसाठी सॅनिटरी नॅपकिन डीसपोसेबल मशीन भेट दिली. या मशीनचे उद्घाटन त्यांची नात. कु साक्षी महेंद्र घाग हिच्या हस्ते फित कापून करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी संस्थेचे पदाधिकारी, अध्यक्ष- सुमित चव्हाण, उपाध्यक्ष सुरेश आग्रे, सचिव रुपेश गोसावी, उपसचिव सुरज शिंदे, संचालक श्रीधर घाग, माजी संचालक प्रवीण खांडेकर, प्रतिष्ठित ग्रामस्थ शांताराम गुरव, मुख्याध्यापक श्री. घाटगे सर व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. नीलकंठ घाग यांनी नायशी माध्यमिक विद्यालयास जेव्हा भेट दिली, तेव्हा शिक्षक वर्गानी मुलीच्या आरोग्यच्या दृष्टीने सेनेटरी नॅपकिन डीसपोसेबल मशीनची आवश्यकता असल्याचे सांगितले होते. त्याचाच विचार करून श्री. घाग यांनी विद्यालयास ही मशीन देणगी स्वरूपात दिली. सॅनिटरी नॅपकिन डीसपोसेबल मशीनचे मशीनचे उद्घाटन त्यांची नात. कु साक्षी महेंद्र घाग हिच्या हस्ते फित कापून करण्यात आले.











