चिपळूणच्या अमेय गोडबोले यांचा ग्यानभूषण पुरस्काराने सन्मान

शैक्षणिक क्षेत्रातील योगदानाबद्दल पुणे येथे गौरव

चिपळूण (प्रतिनिधी) : पुणे येथील ग्लोबल स्कॉलर्स फाउंडेशन यांच्यावतीने चिपळुणातील गोडबोले क्लासेसचे संचालक प्रा. अमेय गोडबोले यांना पद्मश्री सुधाकर ओलवे यांच्या हस्ते ग्यानभूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. पुणे-बाणेर येथील यशदा सभागृहात हा पुरस्कार वितरण सोहळा पार पडला.

ग्लोबल स्कॉलर्सतर्फे दरवर्षी ज्ञान, उद्योग, समाजसेवा, कृषी, साहित्य, कला, क्रीडा क्षेत्रातील भरीव कार्यासाठी पुरस्कार दिला जातो. यासाठी स्कॉलर्स फाऊंडेशनचे बेगावे यांनी कोकणातू प्रा. गोडबोले यांची निवड केली. प्रा. अमेय गोडबोले हे गोडबोले क्लासेसच्या माध्यमातून सातवी ते बारावी माध्यमिक बोर्ड, सीबीएसई, इंग्रजी, सेमी इंग्रजी, मराठी माध्यमातील मुलांना विशेष मार्गदर्शन करून त्यांना घडवण्याचे काम गेल्या १२ वर्षापासून करत आहेत. यावेळी ओलवे यांनी गोडबोले यांच्या या शैक्षणिक सेवेचे कौतुक केले.