चिपळूण (प्रतिनिधी) : चिपळूण शहरतर्फे मार्कंडी मध्यवर्ती कार्यालय येथे राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती तथा राष्ट्रीय युवा दिननिमित्त अभिवादन करण्यात आले. यावेळी त्यांच्या कार्याबद्दल तसेच युवा दिनाबद्दल पदाधिकाऱ्यांनी आपले मनोगत मांडले.
त्याप्रसंगी तालुकाध्यक्ष वसंत ताम्हणकर, शहराध्यक्ष श्रीराम शिंदे, जिल्हा उपाध्यक्ष रामदास राणे, चिपळूण संगमेश्वर विधानसभा विस्तारक प्रसन्ना जाधव, जिल्हा चिटणीस विनोद भोबस्कर, सचिन शिंदे, महिला मोर्चा शहर अध्यक्ष शीतल रानडे, सरचिटणीस निनाद आवटे, विनायक वरवडेकर, सोनू धुमक, ओबीसी मोर्चा शहर अध्यक्ष प्रणय वाडकर, अनुसूचित जाती मोर्चा शहर अध्यक्ष अमित चिपळूणकर, शहर उपाध्यक्ष महेश कांबळी, अमित ओतारी, रोहित हटकर, ऋतुज डाकवे, अश्विनी वरवडेकर, सारीका भावे, स्वाती पटवर्धन, विमल लढ्ढा, प्रणाली सावर्डेकर, श्रृती आवटे, अस्मिता भाटवडेकर आदी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.












