गुहागर l प्रतिनिधी :भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व माजी जिल्हापरिषद उपाध्यक्ष प्रशांत शिरगांवकर यांच्या प्रयत्नाने, आमदार संजय केळकर यांच्या शिफाशीने मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या माध्यमातून गुहागर तालुक्यातील 7 रस्ते विकास कामासाठी 1 कोटी 80 लाखाचा निधी मंजूर करण्यात आला आहे या कामाचे भूमीपूजन आम. संजय केळकर यांच्या शुभहस्ते प्रशांत शिरगांवकर यांच्या उपस्थित मध्ये नुकतेच पार पडले.
यामध्ये मौजे पालशेत – निवोशी, भेलेवाडी रस्ता डांबरीकरण रुपये 10 लाख,मौजे पालशेत – नागझरी रस्ता डांबरीकरण रुपये 20 लाख,मौजे पालशेत बारभाई बौध्दवाडी रस्ता डांबरीकरण रुपये 30 लाख,मौजे पालशेत कोलपवाडी – घुरड वाडी रस्ता डांबरीकरण रुपये 30 लाख,काळसुर कोंढर तांबेवाडी रस्ता 30 लाख,वेळंब वचनवाडी रस्ता 30 लाख,पोमेंडी आडी रस्ता 30 लाख,अशा प्रकारे 1 कोटी 80 लाखांच्या विकासकामाचे भूमीपूजन पार पडले.त्यावेळी जिल्हाध्यक्ष केदार साठे, तालुका प्रमुख निलेश सुर्वे, अभय भाटकर, मंगेश रागले, सरचिटणीस सचिन ओक आणि इतर भाजपा पदाधिकारी व नागरिक मोठया प्रमाणात उपस्थित होते.












