राजापूरच्या नायब तहसिलदार दिपाली पंडीत याना मातृशोक

 

राजापूर (वार्ताहर):येथील नायब तहसिलदार सौ दिपाली पंडित यांच्या मातोश्री श्रीमती सत्यवती रघुनाथ माळकर यांचे (८२) शुक्रवार १२ जानेवारी रोजी अल्पशा आजाराने निधन झाले.

त्याचे मुळ गाव करुळ ( गगणबावडा ) आहे. गेली अनेक वर्ष त्या रायपाटण येथे वास्तव्याला होत्या. त्यांचे पती रघुनाथ माळकर हे तलाठी म्हणून पाचल विभागात नोकरी करत होते. पतीच्या मृत्यू नंतर त्यांनी आपल्या नऊही आपत्यांना चांगल्या पद्धतीने शिक्षण दिले.

रायपाटण येथे त्यांच्यावर संध्याकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या जाण्याने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. त्यांच्या पश्चात एक मुलगा सुन आठ मुली नातंवडे असा मोठा परिवार आहे.