गोगटे महाविद्यालयात पोस्टर्स स्पर्धा

Google search engine
Google search engine

वार्ताहर | पाली : जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी कार्यालय, रत्नागिरी आणि गोगटे जोगळेकर महाविद्यालय,रत्नागिरी यांचे संयुक्त विद्यमाने गोगटे -जोगळेकर महाविद्यालय येथे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ अंतर्गत पोस्टर प्रेसेंटेशन व पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन स्पर्धा,तसेच पाक कला स्पर्धा आयोजित करण्यात आलेली होती. सदर स्पर्धेमध्ये बी.एस.सी. अभ्यासक्रमामध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता. स्पर्धेची थीम आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष २०२३ अशी होती. या स्पर्धेचे बक्षीस वितरण प्राचार्य गोगटे महाविद्यालयतसेच मा.जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी,रत्नागिरी सुनंदा कुऱ्हाडे यांचे हस्ते करण्यात आले.या स्पर्धेसाठी डाॅ.मंगल पटवर्धन,प्रा. जी.एस.कुलकर्णी , विनोद हेगडे तंत्र अधिकारी, जिअकृअ,रत्नागिरी परीक्षक म्हणून लाभले होते. या स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांनी ज्वारी, बाजरी,वरी, कोद्रा, नाचणी, इत्यादी तृणधान्य पिकाविषयी सादरीकरण केले. यावेळी महाविद्यालयाचे वनस्पती शास्त्राचे विभाग प्रमुख प्रा. शरद आपटे ,प्रा.सोनाली कदम, प्रियंका शिंदे, परेश गुरव, ऋतुजा गोडबोले,सागर सांगवे,कृषिसहायक उपस्थित होते.यावेळी इतर मान्यवर आणि महाविद्यालयाचे विद्यार्थी उपस्थित होते.