डॉ. बाबासाहेब आंबेडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात नवागतांचे स्वागत

 

मंडणगड: प्रतिनिधी        येथील मंडणगड तालुका विकास मंडळ F 14 28 मुंबई संचलित ,डॉ. बाबासाहेब आंबेडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय मंडणगड या विद्यालयांमध्ये आज 15 जून 2024 रोजी, शाळेमध्ये नव्याने प्रवेश घेतलेल्या नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. उन्हाळी सुट्टीनंतर पुन्हा एकदा विद्यार्थ्यांच्या किलबिललाटाने शाळा बोलक्या झाल्या. या नवागत विद्यार्थ्यांना गुलाब पुष्प देऊन त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. विजय खाडे उपमुख्याध्यापक श्री.अर्जुन हुल्लोळी, पर्यवेक्षक श्री. शांताराम बैकर व सर्व शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.