दोडामार्ग l प्रतिनीधी :गेल्या तीन चार महिन्यापासून रानटी गवारेडा डुक्कर या वन्य प्राण्यांपासून काजू पिकाचे तसेच नारळाची दोन-तीन वर्षे वयोमान असलेली झाडे या पिकांचे नुकसान झालेले आहे. त्याचे तात्काळ पंचनामे करून कार्यवाही करावी अशी मागणी ग्रा.प. सदस्य सुनील गवस यांनी केली आहे
वारंवार पाठपुरावा करून सुद्धा वन खात्याने याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलेले आहे
त्यामुळे शेतकऱ्यांना शासनाकडून मिळणारी नुकसान भरपाई पासून वंचित राहावे लागत आहे. तसेच अवकाळी पावसामुळे काजूचा मोहोर खराब झालेला असून काजू ची शेती करणाऱ्या शेतकऱ्यांवरती एक प्रकारचे संकटच कोसळलेले आहे वन्य प्राण्यांपासून होणारे शेतीचे नुकसान व पंचनामे करण्यासाठी वन खात्याने दाखवलेली दिरंगाई त्यामुळे मांगेलीतील शेतकरी हवालदिल झालेला आहे. तरी वनखात्याला विनंती आहे की सदर नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे तत्काळ पंचनामे करून त्यांना शासनाकडून मिळणारी नुकसान भरपाई त्वरित मिळावी. अशी मागणी सुनील गवस यांनी केली आहे









