ओवळी येथे आमदार शेखर निकम यांच्या हस्ते विविध विकास कामांचे भुमिपुजन संपन्न

चिपळूण (प्रतिनिधी) : तालुक्यातील ओवळी गावातील आमदार शेखर निकम यांच्या विकास निधीतील जिल्हा वार्षिक योजना, २५१५ योजना, आमदार स्थानिक विकास कार्यक्रम या विविध योजनांतून मंजूर केलेल्या ओवळी मुख्य रस्ता अर्जुनराव शिंदे घर ते विनोद शिंदे घर रस्ता तयार करणे, ओवळी मुख्य रस्ता ते दिनेश शिंदे घर बोंडइवाडी पर्यंत पाखाडी करणे, ओवळी मुख्य रस्ता सदानंद बोलाडे घर ते लक्ष्मण गजमल यांच्या घरापर्यंत संरक्षण भिंत व गटार बांधणे, ओवळी मुख्य रस्ता इप्ते यांचे घर ते ओवळी हायकुल खडीकरण करणे या कामांचे भुमिपुजन आमदार शेखर निकम यांच्या हस्ते झाले.

ओवळी गावच्या बहुसंख्य ग्रामस्थांच्या उपस्थितीत हा भुमिपुजनाचा कार्यक्रम पार पडला. गेली अनेक वर्षांपासून गावातील रस्त्यांची रखडलेली रस्त्यांची कामे होण्यासाठी ग्रामस्थांनी आमदार निकमांकडे मागणी केली. या मागणीला प्रतिसाद देत ग्रामस्थांची होणारी अडचण पाहता आपल्या विकास फंडातून सदर कामे मंजूर केल्याबद्दल ग्रामस्थांनी आमदार शेखर निकम यांचे आभार मानले व सदैव त्यांच्या सोबत राहून आगामी काळात होणा-या निवडणुकांमध्ये जास्तीत जास्त मताधिक्य आमदार शेखर निकम यांना देवून विजयी करणार असे सांगितले.

यावेळी जिल्हा नियोजन सदस्य दादा साळवी, खेर्डी माजी सरपंच दशरथ दाभोळकर, शिरगाव सोसायटी अध्यक्ष जयंत शिंदे, युवक अध्यक्ष निलेश कदम, माहिला तालुका अध्यक्ष जागृती शिंदे, अमित कदम, सतीश सुर्वे, एल. के. शिंदे, ओवळी सरपंच शेवंती पवार, उपसरपंच दिनेश शिंदे, माजी सरपंच केशव कदम, ग्रामपंचायत सदस्य सौ. संपदा बोलाडे, दिपीका शिंदे, गजेंद्र शिंदे, शंकरराव शिंदे, निकिता शिंदे, शशिकांतराव शिंदे, प्रभाकरराव शिंदे, मनोहर घाणेकर, दगडू बोलाडे, पांडुरंग केंबळे, किसन तांबट, पांडुरंग शेळके, नथु झोरे, अजिंक्य शिंदे, अनंत कोकरे, राहुल शिंदे, दीपक शिंदे, वैभव शिंदे, गजेंद्र महाडिक, जाधव मॅडम मुख्याध्यापक व आदी ग्रामस्थ उपस्थित होते.