रत्नागिरी : राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे आयोजित नवोपक्रम स्पर्धेत रत्नागिरीतील मराठा मंदिर अ. के. देसाई हायस्कूलचे उपक्रमशील शिक्षक संतोष शांताराम गार्डी यांना जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक मिळाला आहे. त्यांचा नवोपक्रम राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे.
संतोष गार्डी यांनी इ. 7 वी साठी शिकू आनंदे संबोध भूमितीचे हा नवोपक्रम राबविला. त्यामध्ये त्यानी भूमितीचे मूलभूत संबोध दृढ होण्यासाठी नाविण्यपूर्ण कृतीचे नियोजन केले होते. त्यामुळे भूमिती विषयातील विद्याथ्वीचा सक्रिय सहभाग वाढली. या उपक्रमामुळे भूमितीच्या रचना सफाईदारपणे करू लागला. भूमिती व दैनंदिन जीवन, भूमिती व इतर विषध यांचा सहसंबंध विद्यार्थी शोधू लागला.
नवोपक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था रत्नागिरीच्या अधिव्याख्याता श्रीम. दिपा सावंत यांचे बहुमूल्यं मार्गदर्शन लाभले. त्याचबरोबर प्रशालेतील जेष्ठ शिक्षिका सौ. अंजली पिलणकर, विज्ञान शिक्षिका सौ. वृषाली सावंत, कलाशिक्षक जयसिंग लोहार यांचे सहकार्य लाभले. त्याचबरोबर (मुख्याध्यापिका श्रीम. प्रज्ञा दळी, माजी मुख्याध्यापक प्रमोद शेखर याचे प्रोत्साहन लाभले. विनोद गावखडकर, मिनाल नाखरेकर, सचिन मोहिते, सौ. श्रद्धा नागवेकर, कमलाकर परब, दत्ता घडशी यांचेही सहकार्य, पाठींबा लाभला. यशाबद्दल मराठा मंदिर विद्यावर्धिनीचे पदाधिकारी, पालक शिक्षक संघ, माजी विद्यार्थी यांनी गार्डी यांचे कौतुक केले.










