इंधन बचत अभियानात प्रतिपादन
वेगुर्ला l प्रतिनिधी : केंद्र सरकारच्या पेट्रोलिअम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या आदेशानुसार राज्य मार्ग परिवहन महामंडळ दिनांक १६ जानेवारी ते १५ फेब्रुवारी या कालावधीत इंधन बचत अभियाना राज्य भर राबविण्यात येणार असून या अभियाना अंतर्गत वेंगुर्ले आगार येथे नुकतेच इंधन बचत या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते या वेळी खानोली गावचे सुपुत्र तथा युवा व्याख्याते प्रा.वैभव खानोलकर हे प्रमुख पाहुणे तथा मार्गदर्शक म्हणून बोलताना इंधन बचतीसाठी आवश्यक उपाययोजना आणि कर्मचारी यांनी कोणत्या गोष्टी करणं गरजेचं आणि कोणत्या गोष्टी टाळाव्यात या विषयी आपल्या अभ्यासपूर्ण विवेचनातुन मंथन करताना जागतिक बाजारपेठेतील इंधनांच्या वाढत्या किंमतीचा विपरीत परिणाम एसटीच्या अर्थकारणावर होत असल्याचे सांगितले.
एस् टी बस म्हणजे ग्रामीण भागातील जणू जीवन वाहिनी जवळ पास दर दिवशी 65 लाख प्रवाशांची ने आण करणारी एस् टी ला दर दिवशी सुमारे 12 लाख 12 हजार लिटर इंधन लागते.एस्.टी बस फायद्यात आणण्यासाठी इंधन बचत हा पर्याय महत्वाचा ठरु शकतो. असे मत इंधन बचत अभियानांतर्गत प्रा.खानोलकर यांनी या वेळी व्यक्त केले.
1972 साली दुष्काळात सापडलेला महाराष्ट्र 15 पैशाचा अधिभारावर या एस.टी महामंडळाने जगवला होता.
रोजगार हमी योजनेची उद्गाती हि लालपरी ठरली होती.
कोरोना काळातही निर्भीडपणे एसटी महामंडळाने अनेक लोकांना साथ देत महाराष्ट्राची वारीची पंरपरा अबाधित ठेवण्यासाठी एस.टी रस्त्यावर उतरली होती.
ऊन ,वारा ,पाऊस यांची तमा न करता लाल रस्त्यावर धुरळा उडवत धावणार एस् टी बस म्हणजे महाराष्ट्राची अस्मिता अशा शब्दांत महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे गौरव शाली क्षण आणि भुतकालीन आठवणी या वेळी त्यांनी जाग्या करत एस्.टी चा सुवर्णमय भुतकाळ एसटी कर्मचाऱ्यां समोर मांडला.
मात्र येत्या काळात इंधन दरवाढीचे मोठे संकट समोर असताना एसटी महामंडळाच्या चालकांना इंधन बचत अभियानातून डिझेल वाचविणे, पर्यायाने इंधनावरील अनावश्यक खर्च टाळण्याचे बरोबरच सुरक्षित व सुव्यवस्थित वाहन चालविणे हि सुद्धा चालकांची जबाबदारी असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
इंधन बचत केवळ चालकांची जबाबदारी नसून यांत्रिक विभागातील कर्मचाऱ्यांना हि या इंधन बचतीसाठी जाणिव पुर्वक प्रयत्न करणे आवश्यक आहे त्यासाठी गाडी चे इजिंन ऑइल वेळेतच बदलणं,एअर फिल्टर साफ करणे, टायर मधील हवा प्रत्येक वेळी गाडी मार्गस्थ होण्या अगोदर तपासणे , इंधन गळतीवर त्वरित कार्यवाही करणे,या सोबतच प्रत्येक कर्मचाऱ्याने एस.टी बस आमची नको तर माझीच आहे अशा दृष्टीकोनातुन काम करण्याची गरज सध्यस्थितीत आहे.
चालका सह यांत्रिक विभागातील कर्मचारी आणि महामंडळात सेवा करणारे सर्व कर्मचारी अधिकारी यांनी माझी गाडी समजून जर काम केले तर निश्चितच सकारात्मक बदल घडून येईल कारण एखादी गोष्ट माझी म्हटले की जवळीक , भावनिक आपलेपण वाढते असं ते म्हणाले.
आज परिवहन महामंडळाच्या 31 विभागात 250 आगारात 35000 चालक तर 18000 यांत्रिक कर्मचाऱ्यांना इंधन बचतीसाठी शासनाला असे इंधन बचत अभियान राबविण्याची गरज का पडली?
यांचा हि विचार
एसटी कर्मचाऱ्यांनी केला तर येणाऱ्या काळात अशी अभियाने राबवावी लागणार नाही अन्यथा येणारा काळ संधी कमी आणि आव्हाने घेऊनच आपल्या समोर उभा राहिल असा सुचना वजा इशारा हि त्यांनी दिला.
आपल्या अभ्यासपूर्ण विचारांत एसटी महामंडळाने यशोगाथा आणि सद्य परिस्थिती यांचा वेध घेत इंधन बचतीसाठी प्रा.खानोलकर यांनी मांडलेले विचार अभ्यासपूर्ण असुन त्यांना वैचारिक अधिष्ठान प्राप्त आहेत आणि त्यामुळे निश्चितच ते आम्हाला येणाऱ्या काळात मार्गदर्शक ठरतील असं मत वेंगुर्ले आगार प्रमुख श्री कुंभार साहेब यांनी व्यक्त केले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि मान्यवरा वक्ते यांची ओळख वेंगुर्ले आगाराच्या धनश्री तांडेल यांनी केली तर यांत्रिक कर्मचाऱ्या मधुन शिवराम भोई यांनी प्रा.खानोलकर यांचे यांत्रिक कर्मचारी वर्गाच्या वतीने आभार मानले वाहातुक नियत्रक श्री.चव्हाण यांनी या संपूर्ण कार्यक्रमाचे केंद्र बिंदू असणाऱ्या आणि आपल्या वैचारिक प्रतिभेची चमक दाखवत वेंगुर्ले आगाराच्या सर्व कर्मचारी आणि प्रशासकीय अधिकारी यांना विशेष मार्गदर्शन करणाऱ्या प्रा.खानोलकर यांचे आभार मानले
या वेळी वेंगुर्ले आगारातील चालक नारायण होळकर, तसेच विवेक नवार आणि अन्य चालक व यांत्रिक विभागातील कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते










