शामराव पेजे स्मृती न्यासचे केंद्रीय रेल्वे मंत्री व राज्य रेल्वे मंत्री यांना निवेदन
रत्नागिरी :रत्नागिरी रेल्वे स्टेशन सोडल्यानंतर गोव्याच्या दिशेने जाताना कोणतेही रेल्वे स्टेशन मुंबई-गोवा महामार्गाच्या जवळ येत नाही.त्यामुळे सदर पंचक्रोशी विभागातील म्हणजेच अंजणारी मठ चेनेज नं.२२३/० ते २२४/०. च्या लगत वेरळ,नांदिवली,शिरबली,नाणीज,असोडे,गांगरकर गाव,कटु गाव,मठ, अंजणारी,खानू,पाली, पाथरट,वेळवंड,घाटीबळे,पुनस कोड अशी जवळ जवळ ५० ते ६० गावे
तसेच यामध्ये लांजा तालुक्यातील लोकसंख्या सुमारे ५८,९८३, रत्नागिरीतील लोकसंख्या सुमारे ४५,५०२ व संगमेश्वर तालुकयातील लोकसंख्या सुमारे २७ हजार ८१२ एवढया लोकांना फायदा होउ शकतो.
त्याप्रमाणे मौजे नाणीज येथे जगतगुरू नरेंद्रजी महाराज यांचा प्रचंड मोठा मठ असल्याने तिथे दरदिवशी लाखो लोकांची दर्शनासाठी गर्दी होत असते.तसेच वारीला येणा-या लाखो भावीकांसाठी सोयीचे रेल्वे स्टेशन म्हणून सदरहू ‘अंजणारी मठ’ रेल्वे स्टेशनची नितांत आवश्यकता आहे.तसेच नजिकच स्वयंभू दत्तदेवस्थान व गरम पाण्याचे कुंड असल्याने भाविकांची प्रचंड गर्दी होत असते.नजिकच हायवे असल्याने प्रवाशांना ये-जा करणेसाठी अतिशय सोयीचे होणार आहे.
शामराव पेजे न्यासाचे काम मुंबई उपनगर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर या जिल्ह्यात गेली अनेक वर्षे सुरू आहेच. त्या अनुषंगाने एकंदरीत न्यासाचे वतीने सर्व बाजुंनी विचारार्थ;करण्यात आलेले निवेदन रेल्वे स्टेशनची नितांत आवश्यकताच दर्शवणारे आहे.
निवेदनामध्ये नमूद करण्यात आले आहे की,तत्कालीन केंद्रीय रेल्वे मंत्री मा.श्री.सुरेश प्रभू यांच्या माध्यमातुन नियोजीत रेल्वे स्टेशनची पहाणी देखील झाली आहे.
तरी सदरहू ‘अंजणारी मठ’ रेल्वे स्टेशन चेनेज नं. २२३/० ते २२४/० मंजूरी मिळावी…
यासाठीचे मागणीचे निवेदन श्री.शामराव पेजे स्मृती न्यास यांचे वतीने क्षेत्रीय रेल्वे प्रबंधक,रत्नागिरी यांचेकडे देण्यात आले.याप्रसंगी शामराव पेजे न्यासाचे चे विश्वस्त श्री.गणेश जोशी, कोषाध्यक्ष गजाननजी चाळके, ऍड.महेंद्र मांडवकर, सामाजिक कार्यकर्ते श्री मंदारजी सरपोतदार, आबा बंडबे,कोकण रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष मा.सचिनजी वहाळकर , आशिष सरपोतदार, कुणबी समाज उन्नती संघ रत्नागिरी तालुका चे खजिनदार गजानन धनावडे इत्यादी हजर होते या भेटीसाठी सामाजिक कार्यकर्ते विकासजी पेजे साहेब यांचे विशेष सहकार्य लाभले.









