कुडाळ l प्रतिनिधी : राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना (NMMS) परीक्षेच्या धर्तीवर छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था ( सारथी )पुणे या संस्थेतर्फे भडगाव हायस्कूल मधील NMMS परीक्षा उत्तीर्ण झालेल्या व मराठा, कुणबी-मराठा, कुणबी, मराठा-कुणबी या चार लक्षित गटापैकी इयत्ता नववी मध्ये शिकत असलेल्या हिंदू-मराठा समाजातील कुमारी अलका आनंद लोट, कुमारी शरण्या किशोर सावंत , कुमार साहिल संदीप राणे यांना प्रत्येकी प्रति वर्ष 9600 /- प्रमाणे इयत्ता बारावी पर्यंत चार वर्ष शिष्यवृत्ती मिळणार आहे.
या यशाबद्दल विद्यार्थ्यांचे, त्यांच्या पालकांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे संस्थेचे अध्यक्ष मान. चंद्रशेखर वसंत सावंत , सचिव संभाजी सिताराम वळंजू, सर्व संचालक, प्रशालेचे मुख्याध्यापक श्री सचिन मुकुंद धुरी , शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.











