खेड(प्रतिनिधी) खेड तालुक्यातील फळबाग योजनेच्या महत्मा गांधी ग्रामीण रोजगार योजनेच्या नोव्हेंबर व डिसेंबर महिन्यतील निधी उपलब्ध न झाल्याने २९१० मजूरांची मजुरी रक्कम ५४,४५,७०९ रु उपलब्ध न झाल्याने फळबाग लागवड योजनेचे शेतकरी हवालदील झाले आहेत.
सन २०२२-२३ या वर्षामध्ये २६०. ०० हेक्टर क्षेत्रावर ४२४ साभार्थ्यांनी फळबाग लागवड केली आहे. सन २०२३- २४ वर्षात २९०.६० हेक्टर क्षेभावर ५१२ शेतकी लागवड केली आहे. सदर लागवडीच्या नोव्हेंबर डिसेंबर २०२३ महिन्याची महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत केंद्र सरकार कडून अद्याप निधी उपलब्ध झाला नसल्याने २९१० मजूरांची ५४,४५,००६ रक्कम मिळालेली नाही. जानेवारी २०२४ महिना संपत येवूनही शेतकयांच्या खात्यावर रक्कम जमा न झाल्याने तालुका कृषी अधिकारी श्री माळी यांच्याकडे संपर्क साधला असता निधी अद्याप उपलब्ध नसल्याची माहिती देण्यात आली आहे. तब्बल दोन महिने मजुरी न मिळाल्याने शेतकरी हवालदील झाले असून त्वरीत मजुरी मिळण्याची मागणी होत आहे.









