किरकोळ कारणावरून मारहाण : निवती पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल

वेंगुर्ले : प्रतिनिधी
आमच्या जमिनीमध्ये आलेल्या गुरांना हाकलल्यामुळे मनात राग धरून शिवीगाळ करून लाकडी दांड्याने मारहाण केल्याप्रमाणे कुंभारवाडी तेंडोली येथील प्रकाश कुंभार यांच्या विरोधात निवती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आंबेडकरनगर तेंडोली येथील राहुल पाटकर यांनी निवती पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, १६ जानेवारी रोजी सकाळी १० वा. चे मानाने आमच्या घराच्या अंगाणात असताना आमचे जमिनीत मध्ये आम्ही लावलेले दोन ते तीन वर्षाचे सुपारीचे कलम आमचे शेजारील वाडीत राहणारे प्रकाश नारायण कुंभार यांचे जनावरे खात होते. आपण पुढे जावुन जनावरे आमचे सुपारीचे कलम खात असल्याचे मोबाईल मध्ये व्हीडीओ रेकॉडींग केले व त्यानंतर प्रकाश कुंभार यांना त्याबाबत विचारणा केली असता त्याने माझ्या अंगावर धावुन येवुन शिवागाळी करीत तुझ्या बापाची जमिन आहे का? माझे काय ते करुन घ्या असे बोलुन जनावरांना हकलल्याकरीता त्याचे हातातील असलेला बांबुचा लाकडी दांडयाने मारुन दुखापत केलेली आहे.
या तक्रारीवरून पोलिसांनी भा.द.वि. कलम 323, 324, 352, 504, 506 अन्वये कुंभार याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस हवालदार शामराव कांबळे करत आहेत.