वैभववाडी | प्रतिनिधी : ग्रृप ग्रामपंचायत एडगाव- वायंबोशी च्या उपसरपंचपदी भाजपाच्या सौ. सायली सुनिल घाडी यांची बिनविरोध निवड जाहीर झाली आहे. उपसरपंच पदाची निवडणूक येथील ग्रामपंचायत कार्यालयात पार पडली. यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष श्री. प्रमोद रावराणे, सरपंचा सौ. रविना तांबे, रवळनाथ विकास सोसा.चे चेअरमन श्री सुनिल रावराणे, भाजयुमोचे जिल्हा उपाध्यक्ष श्री.राजु पवार, श्री. विनोद रावराणे, रविंद्र रावराणे, दत्ताराम पाष्टे, सौ.प्रज्ञा रावराणे, सौ. वैष्णवी रावराणे, सौ. चेतना पवार, रविंद्र तांबे, गोविंद घाडी, सुनिल घाडी, बयाजी गुरखे, सखाराम फाळके, योगेश पवार, निवडणुक अधिकारी श्री उमेश राठोड व ग्रामस्थ उपस्थित होते.