गुहागर | प्रतिनिधी : गुहागर मधील महिलांना सॅनेटरी पॅडवर डिटर्जंट पावडर बनवून देण्याचे व घरबसल्या रोजगार मिळवून देण्याचे आश्वासन देणाऱ्या संदीप शरद मुळे याला गुहागर न्यायालयाने दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली होती संदीप मुळे याचेवर भारतीय दंड विधान कलम 419 420 आणि 406 प्रमाणे गुन्हा रजिस्टर करण्यात आला होता सदर आरोपीला मंगळवारी गुहागर न्यायालयासमोर हजर केले असता आरोपीचे वतीने एडवोकेट अलंकार अजित विखारे यांनी युक्तिवाद केला तसेच सदर आरोपीला न्यायालयाने रक्कम रुपये 15000 चे जामीनावर मुक्त करण्याचा आदेश केला आहे आरोपीतर्फे एडवोकेट संकेत साळवी व ऍडव्होकेट अलंकार विखारे,ॲडव्होकेट सुप्रिया वाघदरे हे काम पाहत आहेत.