वेंगुर्ले l प्रतिनिधी : अणसूर पाल हायस्कूल अणसूर येथे, महाराष्ट्र राज्य शासनातर्फे देण्यात आलेल्या निर्देशानुसार,
मराठी राज्यभाषा संवर्धन पंधरवडा कार्यक्रम उद्घाटन शाळेतील कविवर्य मंगेश पाडगावकर वाचन कट्ट्यावर विद्यार्थी,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या उपस्थितीत उत्साहात करण्यात आले.
यावेळी मार्गदर्शक मा.श्री.विजय ठाकर सर यांनी मराठी भाषेची उत्पत्ती, थोरवी-महती , मराठी भाषेतील समृद्ध साहित्य परंपरा – लेखक,कवी, इतिहासकार, नाटककार आदींची माहिती दिली. २८ जानेवारी २०२४ पर्यंत हा कार्यक्रम साजरा होणार आहे. दरम्यान यावेळी त्यांनी ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कुसुमाग्रज यांच्या नाट्यउता-याचे वाचन केले. शिक्षिका सौ.चारुता परब यांनी मकर संक्रांत सणाविषयी विद्यार्थ्याना माहिती दिली.यावेळी मुख्याध्यापक राजेश घाटवळ, शिक्षक सौ अक्षता पेडणेकर,श्री. सुधीर पालकर आदी उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वीततेसाठी शालेय मुख्यमंत्री आदर्श गावडे, विद्यार्थीनी प्रमुख पुर्वा आमडोसकर, अस्मिता गावडे, प्राची गावडे यांनी परिश्रम घेतले.











